

नवी मुंबईत घरेलू कामगारांची नोंदणी आता दररोज
कामगार एकता युनियनच्या पाठपुराव्याला यश
नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : नवी मुंबईतील कामगार कार्यालयात घरेलू कामगारांची नोंदणी आता दररोज सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी ही नोंदणी आठवड्यातून फक्त सोमवारी केली जात असल्याने कामगारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. प्रशासनाच्या निर्णयामुळे कामगार एकता युनियनने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यामुळे नवी मुंबई परिसरातील हजारो घरेलू कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नवी मुंबईतील कामगार कार्यालयात घरेलू कामगारांची नोंदणी दररोज करण्यात यावी या मागणीसाठी कामगार एकता युनियनकडून संबंधित विभागाकडे वर्षभरापासून सातत्याने निवेदने सादर करणे, पाठपुरावा बैठका घेणे आणि प्रशासनाशी संवाद साधणे असे प्रयत्न सुरू होते. याची दखल घेत प्रशासनाने अखेर नोंदणी प्रक्रिया दररोज करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे कामगारांचा वेळ व खर्च दोन्हीची बचत होणार आहे. कामगार एकता युनियनचे प्रतिनिधी सतीश लोंढे आणि जयसिंग रणदिवे यांनी प्रशासनाचे आभार मानत, ही केवळ सुरुवात आहे. कामगारांच्या हक्कांसाठी आमचा लढा पुढेही सुरूच राहील, असे स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.