तळोजा पोलिसांनी १०० नागरिकांना मोबाईल फोन केले परत

तळोजा पोलिसांनी १०० नागरिकांना मोबाईल फोन केले परत
Published on

तळोजा पोलिसांनी १०० नागरिकांना मोबाईल फोन केले परत
पनवेल, ता. २५ (वार्ताहर) ः त्यांच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्या १०० मोबाईल फोनचा शोध घेण्यात तळोजा पोलिसांना यश आले आहे. हे फोन वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रविण भगत यांच्या हस्ते मूळ मालकांना परत केले. या फोनची किंमत तब्बल १६ लाख ३७ हजार रुपये होती.
गहाळ झालेल्या मोबाइल फोनचा शोध घेण्याकरीता केंद्र सरकारने सीईआयआर (सेंट्रल इक्वीपमेंट आयडेंटीटी रजिस्टर) हे पोर्टल कार्यान्वित केले आहे. या पोर्टलचा वापर करुन हरवलेल्या मोबाइल फोनचा शोध घेण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिल्या होत्या. त्यानुसार तळोजा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रविण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ज्ञानोबा धुळगंडे, पोलिस शिपाई सचिन माने, पोलिस हवालदार शंकर शिंदे, अजय मढवी, दिपक सावंत, गुरुनाथ भुंडेरे व पोलिस शिपाई राजेश उगाडे आदींच्या पथकाने १ जून २०२५ ते २४ मार्च २०२६ दरम्यान विशेष मोहिम हाती घेतली होती. या मोहिमेत पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करुन चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेतला. हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त्त करत पोलिसांचे विशेष आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com