

कल्याणमध्ये उच्चभ्रू सोसायटीचा प्रताप
कचरा थेट नाल्यात फेकल्याने पालिकेचा दंड
कल्याण, ता. २५ (बातमीदार) : शहरातील उच्चभ्रू सोसायट्यांकडून कचरा व्यवस्थापनाचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पत्री पूल परिसरातील एका नावाजलेल्या हायप्रोफाईल सोसायटीने ओला व सुका कचरा चक्क जवळच्या नाल्यात फेकल्याचे समोर आले. याप्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिकेने तत्काळ कारवाई करीत सोसायटीला दंडाचा दणका दिला आहे.
संबंधित सोसायटीमधून दररोज मोठ्या प्रमाणावर कचरा बाहेर निघतो, मात्र कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी तो लगतच्या नाल्यात टाकला जात होता. यामुळे नाल्यात कचऱ्याचे ढीग साचून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. आगामी पावसाळ्यात नाला तुंबून पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत होती. या बेजबाबदार कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
प्रशासकीय कारवाई
व्हिडिओची दखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाने घटनास्थळाची पाहणी केली. कचरा फेकल्याचे सबळ पुरावे मिळताच प्रशासनाने संबंधित सोसायटीला दंडात्मक नोटीस बजावून जागेवरच दंडाची वसुली केली. पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या आणि सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही सोसायटीची गय केली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असे पालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांचे समाधान
कचरा टाकणाऱ्या हायप्रोफाईल सोसायट्यांवर झालेल्या या कारवाईमुळे परिसरातील सामान्य नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. केवळ दंड न आकारता अशा सोसायट्यांच्या कचरा व्यवस्थापनावर कायमस्वरूपी देखरेख ठेवावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.