बेकायदा शेड रडारवर

बेकायदा शेड रडारवर
Published on

बेकायदा शेड रडारवर
मिरा-भाईंदर पालिकेकडून कारवाईचे संकेत
भाईंदर, ता. २५ (बातमीदार) : मिरा रोडमधील प्लेझंट पार्क परिसरातील फर्निचर गोदामाला मंगळवारी (ता. २४) रात्री आग लागली होती. या घटनेनंतर अनधिकृत शेडचा मुद्दा चर्चेत आला असून, पालिकेने कारवाईचे संकेत दिले आहेत.
मिरा रोड येथे डिसेंबरमध्ये एका शेडला आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन दलाने सर्वेक्षण करून प्रभागातील अनधिकृत शेडची यादीच प्रभाग अधिकाऱ्यांना दिली होती. ताडपत्री, बांबू असलेले शेड अग्निसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असल्याने त्यावर कारवाई करण्यात यावी, असे अग्निशमन दलाकडून स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. या यादीनुसार शहरात तब्बल ९३ अनधिकृत शेड होती. त्यात प्रभाग ५ मध्ये ५६, प्रभाग ६ मध्ये १३, प्रभाग ४ मध्ये ११, प्रभाग २मध्ये २, प्रभाग १ मध्ये ११ अनधिकृत शेडचा समावेश होता.
दरम्यान, बुधवारी महापौर डिंपल मेहता, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी पाहणी केली.
-------------------------
...अन्यथा कारवाईला सामोरे जा
अग्निशमन दलाच्या पत्राला प्रभाग अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याने त्यांना अभय मिळाले. या आगीच्या घटनेची आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी गांभीर्याने दाखल घेतली. यासंदर्भात बैठक घेऊन बुधवारी आयुक्तांनी संबंधित सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. दोन दिवसांत कारवाई करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा सज्जड दम आयुक्तांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिला.
--------------------------------
अग्निशमन दलाने दिलेल्या सूचनांकडे प्रभाग अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा जाब विचारण्यात आला. त्यांच्याकडून लेखी खुलासा मागवण्यात येणार आहे. शहरातील सर्व अनधिकृत शेडवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com