खड्ड्यांमुळे वरई पारगाव रस्त्याची दुरावस्था

खड्ड्यांमुळे वरई पारगाव रस्त्याची दुरावस्था
Published on

खड्ड्यांमुळे वरई-पारगाव रस्त्याची दुरवस्था


मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या भरावासाठी ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्ता खड्ड्यात


वरई, दहिसर, नावझे आणि नगावे गावच्या हद्दीतील खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता


दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष


मनोर, ता. २५ बातमीदार
मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीसाठी माती-मुरुमाची ओव्हरलोड वाहतूक, रस्त्यालगतच्या खोदकामामुळे वरई-पारगाव रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अवजड वाहतुकीमुळे ठिकठिकाणी रस्ता उखडल्याने अपघातांची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांची गैरसोय दूर करण्यासाठी वरई-पारगाव रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे.

वरई-पारगाव रस्त्यामार्गे मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि सफाळे रेल्वे स्थानक जोडले गेले आहे. त्यामुळे वसई विरार आणि मुंबईकडे जाणारे चाकरमानी या रस्त्याचा वापर मोठ्या संख्येने करतात. सफाळे पूर्वेकडील गावांमधील शेतमालाच्या विक्रीसाठी सफाळे बाजारपेठेत जाणारे शेतकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सफाळे बाजारपेठेत खरेदीला जाणारे ग्राहक या रस्त्याचा वापर करीत आहेत.

मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीचे काम सुरू असल्यामुळे माती-मुरूम वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड वाहनांची वर्दळ वाढली आहे. अवजड वाहतुकीमुळे वरई-पारगाव रस्त्यावरील मोऱ्यांना पडलेली भगदाडे मातीचा वापर करून बुजवण्यात आली होती. रस्त्यावरील खड्डे वाचवताना वाहनचालक आणि दुचाकीस्वारांची तारांबळ उडते. अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली जात आहे.

प्रतिक्रिया

वरई-पारगाव रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ दुरुस्तीचे काम सुरू केले पाहिजे. वरई-पारगाव रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्याचे मजबुतीकरण करण्याची आवश्यकता आहे.

- प्रीतम पाटील, ग्रामस्थ, नावझे

# प्रतिक्रिया,

नावझे आणि नगावे गावाच्या हद्दीतील दोन्ही खड्ड्यांची दुरुस्ती तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे निर्देश देण्यात येतील. वरई-पारगाव रस्त्याच्या मजबुतीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
-अजय जाधव,उप विभागीय अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग

वरई-पारगाव रस्त्यालगत मुंबई-बडोदरा द्रुतगती महामार्गाचे काम सुरू झाल्याने वरई-पारगाव रस्त्यावरील अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्डे आणि उताराच्या ठिकाणी कॅम्पमध्ये अवजड वाहने वळण घेत असल्याने अपघातांची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com