शहीद दिनानिमित्त अलिबागमध्ये देशभक्तीपर पदयात्रा

शहीद दिनानिमित्त अलिबागमध्ये देशभक्तीपर पदयात्रा
Published on

शहीद दिनानिमित्त अलिबागमध्ये देशभक्तीपर पदयात्रा
क्रांतिकारकांच्या बलिदानाची आठवण; युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
अलिबाग, ता. २५ (वार्ताहर) : तरुणांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी तसेच क्रांतिकारकांच्या बलिदानाची स्मृती जपण्यासाठी अलिबागमध्ये शहीद दिनानिमित्त पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय, भारत सरकार, रायगड-अलिबाग, प्रिझम सामाजिक विकास संस्था आणि स्पर्धा विश्व अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला.
जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा आयोजित करण्यात आली. २३ मार्च रोजी शहीद दिनानिमित्त भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले.
भारतात दरवर्षी २३ मार्च रोजी शहीद दिन साजरा केला जातो. १९३१ मध्ये याच दिवशी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू या तीन थोर क्रांतिकारकांना लाहोर जेलमध्ये ब्रिटिश सरकारने फाशी दिली होती त्यांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी दिलेल्या त्याबद्दल हा दिवस साजरा केला जातो. यावेळी भारत माता की, जय, शहीद जवान,अमर रहे, वंदे मातरम, या घोषणांचा जयघोष करण्यात आला. पदयात्रेत स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका तथा स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता साळवी, स्पर्धा विश्व अकॅडमीचे युवक- युवती, ग्रामस्थ सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com