एकदरा येथे श्रीराम मंदिर सभामंडपाचे लोकार्पण

एकदरा येथे श्रीराम मंदिर सभामंडपाचे लोकार्पण
Published on

एकदरा येथे श्रीराम मंदिर सभामंडपाचे लोकार्पण
रामनवमीच्या पूर्वसंध्येला सोहळा; विकासकामांसाठी निधीची घोषणा
मुरूड, ता. २५ (बातमीदार)ः मुरुड शहरालगत एकदरा गावातील श्रीराम मंदिरातील सभामंडपाचे लोकार्पण सोहळा राम नवमीच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषद सदस्य व शिवसेनेचे नेते विघ्नेश माळी यांच्या हस्ते करण्यात आला.
स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्या शिफारशीने मंत्रालयातील २५ व १५ या शीर्षाखाली १५ लाख रुपये सभामंडपासाठी खर्च करण्यात आला आहे .
या लोकार्पणप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख भरत बेलोसे, शिवसेनेचे मुरुड तालुका बांधकाम विभाग प्रमुख दिनेश मिणमिने, सरपंच ज्योती वाघरे, सरपंच शरद खेडेकर, तालुका उपप्रमुख मनोज कमाने चेअरमन पांडुरंग आगरकर, चिंतामणी लोदी, ध्रुव लोदी, जगन वाघरे, पंचायत समिती सदस्य गणेश नाक्ती, योगेश जयस्वाल,कॉन्ट्रॅक्टर रुपेश जामदार, चिंतामणी आगरकर, हरिचंद्र आगरकर सदस्य चंद्रा वाघरे,शर्मिला वाघरे आदी मान्यवर उपस्थित होते .
मार्गदर्शन करताना विघ्नेश माळी यांनी श्रीराम मंदिराच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून देण्याचे संकेत दिले. तसेच गायमुख परिसराच्या विकासासह एकदरा पुलाच्या नव्या बांधकामासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com