मध्यरेल्वेच्या मोहीमेविरोधात २९ मार्चला कसारा बंद

मध्यरेल्वेच्या मोहीमेविरोधात २९ मार्चला कसारा बंद
Published on

मध्य रेल्वेच्या मोहिमेविरोधात २९ मार्चला कसारा बंद
शहापूर, ता. २५ (वार्ताहर) ः मध्य रेल्वेच्या लोहमार्ग विकासासाठी शहापूर तालुक्यातील कसारा गावातील रेल्वेमार्गालगतची रहिवासी घरे, दुकाने आणि टपऱ्या उठविण्यात येत असल्याने शेकडो नागरिक विस्थापित होणार आहेत. रेल्वेने सुरू केलेल्या या मोहिमेविरोधात संतप्त ग्रामस्थांनी यापूर्वीच आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार येत्या रविवारी (ता. २९) कसारा गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गावातून रॅली काढण्यात येणार असून गावकऱ्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींचाही निषेध नोंदविण्यात येणार असल्याची माहिती कसारा बचाव कृती समितीने दिली.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com