

कल्याणच्या कचोरे गावात पोलिसांचे संचलन
रामनवमीच्या पार्श्वभूमीवर शिस्तीचे दर्शन
कल्याण, ता. २५ (बातमीदार) : श्रीरामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी कल्याणमधील टिळकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कचोरे गावात पोलिसांनी भव्य पथसंचलन केले.
डीसीपी झोन तीन यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचलन पार पडले. ७० पोलिस अधिकारी आणि अंमलदारांनी या संचलनात सहभाग नोंदवून शिस्तीचे दर्शन घडवले. उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना जरब बसावी, हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे.
संचलनादरम्यान पोलिसांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. श्रीराम जन्मोत्सव अत्यंत उत्साहात; मात्र नियमांचे पालन करून साजरा करावा, सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. काही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, उत्सव निर्भयपणे साजरा करण्यासाठी पोलिस प्रशासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या पथसंचलनामुळे कचोरे आणि परिसरातील नागरिकांमध्ये विश्वासार्हतेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस दलाने आपल्या सज्जतेचा संदेश दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.