

दूषित पाण्यामुळे नेरूळमधील फ्लेमिंगो अधिवास धोक्यात
डीपीएस तलावातील रसायनांचे वाढते प्रमाण; पर्यावरणप्रेमींची चिंता व्यक्त
तुर्भे, ता २४ (बातमीदार) : नवी मुंबईतील नेरूळ परिसरातील डीपीएस शाळेजवळील तलावातील पाणी दूषित झाल्यामुळे फ्लेमिंगो पक्षांचा अधिवास धोक्यात आल्याची बाब समोर आली आहे. अलीकडे करण्यात आलेल्या पाणी चाचणीत रसायनयुक्त घटकांचे प्रमाण वाढल्याचे निष्पन्न झाले असून, यामुळे तलावात फ्लेमिंगोंचे आगमन लक्षणीयरीत्या घटले आहे.
नवी मुंबईच्या खाडी परिसरात समृद्ध जैवविविधतेमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर परदेशी पक्षी, विशेषतः फ्लेमिंगो, येत असतात. त्यामुळे शहराला ‘फ्लेमिंगो सिटी’ अशी ओळख मिळाली आहे. मात्र, सीवुड येथील डीपीएस तलावातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह खंडित झाल्याने पाणी साचून राहते आणि त्याचे शुद्धीकरण होत नाही. परिणामी शेवाळ वाढ, दुर्गंधी आणि रासायनिक प्रदूषण वाढत आहे.
र्यावरणप्रेमींनी केलेल्या चाचणीत पाण्यातील रसायनांचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. त्यामुळे फ्लेमिंगोंनी या ठिकाणी येणे टाळल्याने त्यांच्या अधिवासावर संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून या संवेदनशील पर्यावरणीय क्षेत्राचे संरक्षण करावे, अशी मागणी नॅट कनेक्ट फाउंडेशनचे संस्थापक बी. एन. कुमार यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.