

आठ कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन
मुंबई, ता. २५ : वरळीच्या नेहरू आर्ट गॅलरीत जे. जे. कला महाविद्यालयाच्या आठ कला विभागांतील आठ कलाकारांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक किरण शांताराम यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कलाकार आणि चाहत्यांची मोठी उपस्थिती होती. हे प्रदर्शन सर्व कला रसिकांसाठी येत्या ३० मार्चपर्यंत खुले राहणार आहे.
या आठ कलाकारांमध्ये विजय भिंगार्डे (डिजिटल पेंटिंग), विजयकुमार पांडव, विद्या पांडव आणि विद्या नारळकर (सर्व पेंटिंग), सुरेशचंद्र तारकर (फोटोग्राफी), अभिजित चौबळ (लाकडी भित्तिचित्रे), सुनील कदम (फोटोग्राफी) आणि साधना कदम (वॉटरकलर पेंटिंग) यांचा सहभाग आहे. या सर्वांनी साकारलेल्या कलाकृती कलारसिकांचे मन आकर्षित करीत असून, कला प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.