

वज्रेश्वरी, ता. २५ (बातमीदार) : भिवंडी ग्रामीण पट्ट्यात सुरू असलेल्या रस्ते काँक्रीटीकरण व इतर पायाभूत विकासकामांमुळे अंबाडी-शिरसाड मार्गावरील जलवाहिन्या उखडल्याने परिसरातील विविध गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. १५ ते २० दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
भिवंडी-वाडा मार्गासह अंबाडी, शिरसाड, वज्रेश्वरी, गणेशपुरी व अंतर्गत पाड्यांमध्ये रस्ते उखडताना बुलडोझरच्या कामांमुळे जलवाहिनी तुटणे, नादुरुस्त होणे किंवा खबरदारी म्हणून काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद ठेवणे अशा समस्या उद्भवत आहेत. परिणामी, अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा अत्यल्प होत आहे. काही ठिकाणी अपुऱ्या पाण्यामुळे नागरिकांना विकतच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. वाढत्या उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढली असताना, या टंचाईमुळे नागरिकांवर दुहेरी संकट कोसळले आहे. विकासकामे पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याने, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी यंदाचा उन्हाळा अधिकच कठीण ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तातडीने पर्यायी उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आर्थिक फटका
दरम्यान, लग्नसराई, विविध कार्यक्रम, उन्हाळी शेती; तसेच सुरू असलेल्या विकासकामांमुळे पाण्याची मागणी अधिकच वाढली आहे. विशेषतः काही आदिवासी पाड्यांमध्येही नागरिकांना विकत पाणी घ्यावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या परिस्थितीचा फायदा घेत काही पाणीपुरवठादार चढ्या दराने पाणी विकत आहे. याचा नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.