कामोठेत सिडकोच्या मुख्य जलवाहिनीतून पाणी चोरी

कामोठेत सिडकोच्या मुख्य जलवाहिनीतून पाणी चोरी
Published on

पनवेल, ता. २५ (वार्ताहर) : कामोठे, कळंबोली, तळोजा व खारघर परिसरातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत असतानाच, कामोठे सेक्टर-१० मधील एका सर्व्हिस सेंटर चालकाने सिडकोच्या मुख्य जलवाहिनीला अनधिकृत नळजोडणी करून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सिडकोच्या पथकाने केलेल्या तपासणीत हा प्रकार उघडकीस आला आहे. कामोठे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सध्या कामोठे, कळंबोली, तळोजा व खारघर परिसरातील नागरिक पाणीटंचाईमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे सिडकोला काही भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. अशा परिस्थितीत कामोठे सेक्टर-१० येथील मुरारी कृष्णा अपार्टमेंटमधील शॉप नं. १० मधील स्वप्नील सर्व्हिस सेंटर चालकाने सिडकोच्या मुख्य जलवाहिनीला अनधिकृतपणे नळजोडणी करून पाणी चोरी सुरू केली होती. याबाबतची माहिती सिडकोच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार तपासणी केली असता, अनधिकृतपणे नळजोडणी करून त्याद्वारे पाणीचोरी केल्याचे आढळून आले. त्याने १ ऑक्टोबर २०२५ ते १७ मार्च २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण ४,५७५ घनमीटर (पाच लाख ३७ हजार १८० रुपये) पाण्याची चोरी करुन त्याचा अनधिकृतरीत्या वापर केल्याचे आढळून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com