करंजाडे गाडी नदीवरील पुलाच्या कामाला सुरुवात

करंजाडे गाडी नदीवरील पुलाच्या कामाला सुरुवात
Published on

करंजाडे गाढी नदीवरील पुलाच्या कामाला सुरुवात
कामोठे, ता.२५ (बातमीदार) : करंजाडे येथील गाढी नदीच्या पुलावर पनवेल महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ५० कोटी रुपयांच्या महत्त्वाकांशी पुलाचे काम आता प्रत्यक्ष सुरू करण्यात आले आहे. हा पूल प्रत्यक्ष कार्यान्वित झाल्यावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यापूर्वी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या पुलाच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. सोमवारी या पुलाच्या प्रत्यक्ष कामाचा प्रारंभ करंजाडे ग्रामपंचायतचे सरपंच मंगेश शेलार यांच्या हस्ते झाला. या पुलासाठी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. पुलाचे काम पूर्ण झाल्यावर या परिसरातील दळणवळणाला गती मिळणार आहे.
सध्या नागरिकांना वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. विशेषतः पनवेल शहर, करंजाडे व वडघर येथील वाढत्या वाहतुकीमुळे या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्‍भवत आहे.
हा नवीन पूल कार्यान्वित झाल्यावर या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत मिळणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी या उड्डाणपुलाचा उपयोग होणार असल्याची माहिती सरपंच मंगेश शेलार यांनी पुलाच्या कामाच्या प्रारंभी दिली. यावेळी भाजप पदाधिकारी कर्णा शेलार, नाथा भरवाड अतिश साबळे उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com