पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद

पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद
Published on

पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद
कामोठे, ता.२५ (बातमीदार) : पनवेल महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कामोठे यांच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात कामोठे येथील सेक्टर २२ येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे. या केंद्रामार्फत नागरी भागात वास्तव्यास असलेल्या सामान्य जनतेस पुरेशा आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मंगळवारी विशेष बाह्य संपर्क सेवा आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या आरोग्य शिबीरात कामोठे परिसरातील अनेक नागरिकांनी सामान्य तपासणी, क्षयरोग, कुष्ठरोग, त्वचारोग, विविध रक्त तपासणी, नेत्ररोग तपासणी, स्त्रीरोग, बालरोग यासारख्या विविध आजारावरील तपासणींचा मोफत लाभ व वैद्यकीय सल्ला घेतला.
पनवेल महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे आरोग्य केंद्रातील डॉ. संकेत पोवार यांच्या वैद्यकीय सहकाऱ्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com