गतिरोधकासाठी रस्ता रोकोचा इशारा

गतिरोधकासाठी रस्ता रोकोचा इशारा
Published on

मुरबाड, ता. २५ (वार्ताहर) : कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील टोकावडे येथे मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसवण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ‘रस्ता रोको’ आंदोलनाचा इशारा दिला आहे. यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
टोकावडे कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पवार, माजी सरपंच राजेश भांगे, ग्रामपंचायत टोकावडे यांच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या कार्यकारी अभियंत्यांकडे गतिरोधक बसवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, आजपर्यंत कोणतीही दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.
टोकावडे हे परिसरातील महत्त्वाचे बाजारपेठेचे केंद्र असून गाव रस्त्याच्या दक्षिणेला आहे. तर उत्तरेला माध्यमिक विद्यालय (७५० विद्यार्थी), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (८५ विद्यार्थी), पोलिस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, महिला व बालकल्याण विभाग; तसेच वन विभागाची कार्यालये आहेत. त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, महिला व नागरिकांना हा रस्ता ओलांडावा लागतो. दरम्यान, रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बाजारपेठेतूनही वाहने वेगाने धावत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी तत्काळ गतिरोधक बसवणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शनिवारपर्यंत गतिरोधक बसवले नाही, तर सोमवारी (ता. ३०) विद्यार्थी, महिला व नागरिकांच्या सहभागातून रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा प्रकाश पवार, संजय पवार व राजेश भांगे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com