ठाणे महापालिकेत अर्थसंकल्पीय चर्चेला ‘वेळेचे बंधन’

ठाणे महापालिकेत अर्थसंकल्पीय चर्चेला ‘वेळेचे बंधन’
Published on

अर्थसंकल्पी चर्चेला ‘वेळेचे बंधन’
महापालिकेत नगरसेवकांना मुद्दे मांडण्यासाठी अवघी २० मिनिटेच

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : ठाणे महापालिकेच्या २०२६-२७च्या अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेत यंदा वेळेचे बंधन लागू करत प्रत्येक नगरसेवकाला केवळ २० मिनिटांतच आपले मुद्दे मांडण्याची अट घालण्यात आली. त्यामुळे सभागृहाच्या कामकाजाला गती मिळाली असली, तरी अनेक सदस्यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सादर केलेला सुमारे सहा हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प करवाढ टाळत मांडण्यात आला आहे. या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते; मात्र प्रारंभीच्या सत्रात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. काही नगरसेवकांनीच चर्चा केली आणि त्यातही काहींनी दीर्घकाळ भाषण केल्याने इतरांना बोलण्याची संधी कमी मिळाली. सभागृहात एकूण सदस्यसंख्या मोठी असल्याने सर्वांना समान वेळ मिळावा, यासाठी प्रशासनाने दुसऱ्या सत्रात ‘टाइम लिमिट’चा प्रयोग राबवला. लोकसभा-विधानसभेच्या धर्तीवर प्रत्येक नगरसेवकासाठी २० मिनिटांची मर्यादा निश्चित करण्यात आली. १५ मिनिटांनंतर बेल वाजवून वेळ संपत आल्याचा इशाराही देण्यात आला. महापालिका सचिव मनीष जोशी यांनी स्पष्ट केले, की वेळ अपुरा पडल्यास अतिरिक्त सूचना लेखी स्वरूपात सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. या नव्या नियमांनुसार पुढील सत्रात चर्चा सुरळीत पार पडली आणि सदस्यांनी मर्यादित वेळेत आपली मते मांडली.

नगरसेवकांची खंत
अनेक वर्षांनंतर निवडून आलेल्या नगरसेवकांना अर्थसंकल्पी चर्चेत सहभागाची संधी मिळाल्याने उत्साह होता; मात्र वेळेच्या बंधनामुळे काहींना सविस्तर मांडणी करता आली नाही, अशी खंत व्यक्त करण्यात आली. पूर्वी अर्थसंकल्पी चर्चांमध्ये तासन्तास चालणारी सखोल मांडणी ही परंपरा होती. त्या तुलनेत यंदाचा ‘टाइम लिमिट’चा प्रयोग हा कामकाजाला वेग देणारा असला, तरी चर्चेची खोली कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com