मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ‘टाटा’चे ईव्ही चार्जिंग स्टेशन

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ‘टाटा’चे ईव्ही चार्जिंग स्टेशन
Published on

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ‘टाटा’चे ईव्ही चार्जिंग स्टेशन

मुंबई, ता. २५ : विजेवरील वाढत्या वाहनांच्या पार्श्वभूमीवर टाटा पाॅवरने मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोर येथे पहिले १८० किलोवॉटचे अल्ट्रा-फास्ट ईव्ही चार्जिंग स्टेशन कार्यान्वित केले असल्याचे कंपनीने सांगितले. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्यांसाठी आता लांब पल्ल्याचा प्रवास कमी वेळेत आपली वाहने चार्ज करता येणार आहे. देशातील वर्दळीचा महामार्ग म्हणून मुंबई-अहमदाबाद मार्गाकडे पाहिले जाते. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून टाटा पाॅवरने विठ्ठल कामत रेस्टॉरंटनजीक चार्जिंग स्टेशन उभारले आहे. या उच्च क्षमतेच्या चार्जरमुळे चार्जिंगसाठी लागणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल आणि ईव्हीने होणारा लांब पल्ल्याचा प्रवास अधिक विनासायास, कार्यक्षम आणि चिंतामुक्त होईल. दरम्यान, कंपनी सध्या ६३० पेक्षा अधिक शहरे आणि निमशहरांमध्ये दोन लाखांहून अधिक होम चार्जर्स, ६,७०० पेक्षा जास्त सार्वजनिक, निम-सार्वजनिक आणि फ्लीट चार्जिंग पॉइंट्स आणि १,२०० हून अधिक ई-बस चार्जिंग पॉइंट्स चालवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com