डीपी-स्टेट्सवर राजकीय फोटो टाकल्यास कारवाई

डीपी-स्टेट्सवर राजकीय फोटो टाकल्यास कारवाई
Published on

डीपी-स्टेटसवर राजकीय फोटो टाकल्यास कारवाई

ठाणे पालिकेचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश

ठाणे, ता. २५ : ठाणे महापालिकेने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोबाईल डीपी किंवा स्टेटसवर राजकीय नेते व पक्षांचे फोटो न ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

महासभेत काही नगरसेवकांनी अधिकारी-कर्मचारी राजकीय पक्षांना झुकते माप देत असल्याचा आरोप केला होता. तसेच व्हॉट्सअ‍ॅप डीपी व स्टेटसवर राजकीय नेत्यांचे फोटो ठेवण्याबाबत आक्षेप नोंदविण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने निर्बंध लागू केले आहेत. मोबाईलच्या डीपी किंवा स्टेटसवर राजकीय नेते, पक्ष किंवा प्रचाराशी संबंधित फोटो ठेवणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा ठाणे महापालिकेने दिला आहे. उपायुक्त जी. जी. गोदेपुरे यांनी याबाबत लेखी आदेश जारी करत अशा प्रकारांना यापुढे अजिबात सहन केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता थेट शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com