स्वायत्त महाविद्यालयातील अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाची नियमावली

स्वायत्त महाविद्यालयातील अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाची नियमावली
Published on

चारवर्षीय पदवीला ऑनर्स-रिसर्च तत्त्वांना मंजुरी
स्वायत्त महाविद्यालयातील अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाची नियमावली
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना एमएससी नॅनो सायन्सच्या दुसऱ्या वर्षाला मिळेल प्रवेश

मुंबई, ता. २६ ः मुंबई विद्यापीठाच्या विद्या परिषदेत चारवर्षीय पदवी अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षासाठी ऑनर्स व ऑनर्स विथ रिसर्चच्या मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी देण्यात आली. हा निर्णय ‘महासार्क’च्या शिफारशींनुसार घेण्यात आला असून, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून लागू होणार आहे.
नवीन संरचनेनुसार पदवी अभ्यासक्रम नेशनल क्रेडिट फ्रेमवर्कनुसार ओळखला जाणार आहे. तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षासाठी ऑनर्स किंवा ऑनर्स विथ रिसर्च हे दोन पर्याय निवडता येणार आहेत. या चार वर्षांच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना १६० ते १७६ क्रेडिट्स पूर्ण करणे आवश्यक राहील. चौथ्या वर्षात मुख्य विषयाचा सखोल अभ्यास, इंटर्नशिप तसेच संशोधन प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक असेल. या पर्यायात विद्यार्थ्यांना त्यांच्या मुख्य विषयात १२ क्रेडिट्सचा संशोधन प्रकल्प किंवा प्रबंध पूर्ण करावा लागेल. हा प्रकल्प सातव्या आणि आठव्या सत्रात पूर्ण केला जाईल. यासाठी पात्रता ७.५ सीजीपीए अशी असेल.
चौथे वर्ष सुरू करण्यासाठी संबंधित महाविद्यालयाकडे पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा संशोधन केंद्र असणे आवश्यक राहणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष आणि पदवीच्या चौथ्या वर्षामध्ये सुसंगती ठेवण्यात येणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीअंतर्गत मुंबई विद्यापीठाच्या या दूरगामी निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगले, लवचिक आणि संशोधनाभिमुख शिक्षण मिळणार असून, पुढील शिक्षणासाठी नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. लवकरच याबाबतची नियमावली विद्यापीठामार्फत जाहीर केली जाणार आहे.


अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाची नियमावली
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध स्वायत्त महाविद्यालयांमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध अभ्यासक्रमांसाठी नियमावली तयार करण्याची बाब आजच्या विद्या परिषदेच्या बैठकीत मांडण्यात आली. यानुसार आता सर्व स्वायत्त महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमांची रचना केली जाणार असून यासाठी परिपत्रक लवकरच विद्यापीठाकडून जाहीर केले जाणार आहे.


नॅनो टेक्नॉलॉजीच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश
मुंबई विद्यापीठाच्या एमएससी नॅनो सायन्स व नॅनो टेक्नॉलॉजीच्या दुसऱ्या वर्षाची प्रवेश पात्रता आजच्या विद्या परिषदेच्या बैठकीत निश्चित करण्यात आली असून चार वर्षे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना एमएससी नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजीच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रविष्ट होता येईल. पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशानंतर दोन अनिवार्य अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतील. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या एकत्रीकरणामुळे सेमिकंडक्टर, बॅटरी तंत्रज्ञान आणि ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचे विद्यार्थ्यांना विस्तृत अध्ययन आणि संशोधन करता येईल, तसेच करिअरच्या विविध संधींचे दालन यामुळे खुले होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com