पदपथावर केबल वायरचे अडथळे

पदपथावर केबल वायरचे अडथळे
Published on

पदपथावर केबल वायरचे अडथळे
धारावी (बातमीदार) : सायन स्थानकासमोरील लाल बहादूर शास्त्री मार्गाहून धारावीकडे येणाऱ्या रस्त्यावरील पदपथावर केबल वायर लोंबकळत असल्याने पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे पादचारी व स्थानिक रहिवासी संताप व्यक्त करत आहेत. सायन स्थानकासमोरील वाहतूक पूल नूतनीकरण करण्यासाठी बंद आहे. यामुळे स्थानकातून धारावीकडे येण्यासाठी प्रवाशांना पदपथावरून जावे लागते. स्थानकातून येणाऱ्या व जाणाऱ्या तसेच नाईकनगरमधील रहिवाशांना पदपथावरून जाताना गर्दीतून व केबल वायरच्या जाळ्यातून स्वतःला वाचवत मार्ग काढावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com