

रस्ता रुंदीकरणाविरोधात जनरोष
प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर अडचणींचा पाढा
विक्रमगड, ता.२६ (बातमीदार)ः त्र्यंबकेश्वर-जव्हार-विक्रमगड- मनोर-पालघर मार्गाच्या रस्ता रुंदीकरणामुळे बाधित शेतकरी, व्यापाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी बैठकीत स्थानिक नागरिकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर विविध अडचणींचा पाढा वाचला.
बैठकीस भूसंपादन शाखा पालघरचे अप्पर निवासी जिल्हाधिकारी रवींद्र राजपूत, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती शिंदे, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील,विक्रमगड तहसीलदार मयूर चव्हाण तसेच गटविकास अधिकारी महेश पांढरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने बाधित नागरिकही उपस्थित होते. भूमिपुत्र एकजूट संघर्ष समिती, पालघर जिल्हा यांच्या वतीने कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. यावेळी शेतकरी, रहिवासी, व्यापारी, आदिवासींच्यावतीने शासन दरबारी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
------------------------------
‘समृद्धी’प्रमाणे मोबदला द्या
समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर ज्या प्रमाणे बाधितांना भरघोस मोबदला देण्यात आला, त्याच धर्तीवर बाधितांनाही समान मोबदला देण्यात यावा, अशी मागणी विश्वनाथ पाटील यांनी केली. तसेच रस्ता रुंदीकरणामुळे घरे, शेती, व्यावसायिक जागांवर होणारा परिणाम, पुनर्वसनाचे प्रश्न तसेच नुकसानभरपाईचे निकष यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.