

‘शेती टिकली तर माणूस टिकेल’
विरार (बातमीदार) ः वसई शेतकरी सोसायटीतर्फे शेतकऱ्यांसाठी ‘कडधान्य लागवड व प्रक्रिया उद्योग’ या विषयावर मार्गदर्शन व्याख्यान घेण्यात आले. या वेळी वसईसारख्या ठिकाणी वाढत्या शहरीकरणात शेतकऱ्यांना शेती करावीशी वाटते, हे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र कोसबाड येथील कृषी शास्त्रज्ञ डॉ. भरत कुशारे यांनी देवतलाव येथील वसई शेतकरी सोसायटीच्या कार्यक्रमात बोलताना केले.