नागमोडी वळणामुळे घात

नागमोडी वळणामुळे घात
Published on

नागमोडी वळणामुळे घात
दापचरी चेकपोस्टवर कारचा अपघात

तलासरी, ता. २६ (बातमीदार) ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलासरी दापचरी चेकपोस्ट गुजरातहून मुंबईकडे निघालेली कार नागमोडी वळणाच्या सिमेंट बॅरिकेड्सवर जोरात आदळली. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
भरधाव कारचा गुरुवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. स्थानिकांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षीदेखील अशाच प्रकारचा अपघात झाला होता. त्या वेळी डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी जेसीबीच्या साहाय्याने बॅरिकेड्स हटवले होते; मात्र काही दिवसांनंतर पुन्हा बॅरिकेड्स पूर्ववत करण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या ठिकाणी असलेल्या नागमोडी वळणांमुळे वाहनांची गती कमी केली जाते; पण वारंवार अपघात होत असल्यामुळे वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
----------------------------------
तपासणीच्या नावाखाली वसुली
तपासणीच्या नावाखाली चालकांकडून दंडाची बेकायदा वसुली केली जात असल्याचे आरोप केले आहेत. या ठिकाणी वाहतूक पोलिसांचा सकाळी, संध्याकाळी बंदोबस्त असतो; मात्र ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते, त्या ठिकाणी पोलिस उपस्थित नसल्याचा आरोप होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com