रासायनिक सांडपाण्याने नाकीनऊ

रासायनिक सांडपाण्याने नाकीनऊ
Published on

रासायनिक सांडपाण्याने नाकीनऊ
अंबर हॉटेलशेजारच्या वाहिनीला जेसीबीचा धक्का

बोईसर, ता. २६ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अंबर हॉटेलशेजारी गटाराचे काम सुरू असताना जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करताना रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी तुटली. या घटनेमुळे सांडपाणी रस्त्यावर आल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली होती.
या गळतीमुळे स्थानिक नागरिकांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत असून, आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. आधीच तारापूर परिसरात प्रदूषणाच्या तक्रारी सातत्याने होत असताना अशा प्रकारची निष्काळजी घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या घटनेबाबत एमआयडीसीचे अभियंता अविनाश संखे यांनी घटनेची माहिती घेतली असून तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना केली जाईल, असे स्पष्ट केले.
-----------------------------
दीड तास गोंधळाचे वातावरण
घटना घडून जवळपास दीड तास उलटूनही संबंधित विभागाचा एकही अधिकारी घटनास्थळी दाखल झाला नव्हता. त्यामुळे रासायनिक पाणी अधिक प्रमाणात परिसरात पसरण्याची भीती व्यक्त केली जात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com