घाटकोपरमध्ये पोलिसांचा रूट मार्च

घाटकोपरमध्ये पोलिसांचा रूट मार्च
Published on

शोभायात्रांच्या पार्श्वभूमीवर घाटकोपरमध्ये पोलिसांचा रूट मार्च

घाटकोपर, ता. २६ (बातमीदार) ः श्री राम सेवा संघासह विविध संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी घाटकोपर पोलिसांनी रूट मार्च काढला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च झाला. परिसरातील प्रमुख मार्गांवरून मार्च काढण्यात येऊन त्याची सांगता घाटकोपर रेल्वे स्थानक येथे करण्यात आली. या रूट मार्चमध्ये घाटकोपर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, राज्य राखीव पोलिस दल तसेच होमगार्डचे जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांच्या या दक्षतेमुळे परिसरात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com