क्षयरोग दिनानिमित्त रॅली, पथनाट्यातून जनजागृती

क्षयरोग दिनानिमित्त रॅली, पथनाट्यातून जनजागृती
Published on

क्षयरोग दिनानिमित्त रॅली, पथनाट्यातून जनजागृती
अलिबाग, ता. २८ (वार्ताहर) : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त मंगळवारी (ता.२४) अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालय येथून रॅली काढून, पथनाट्य सादर करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निशिकांत पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्राची नेहुलकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सामुदायिक औषधशास्त्राचे विभागप्रमुख डाॅ. हरळकर यांच्यासह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी क्षयरोगमुक्त ग्रामपंचायतींसाठी शपथ देण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालय येथून रॅलीची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी जनजागृतीपर पथनाट्य सादर करून क्षयरोगमुक्तीसाठी नागरिकांनी सतर्क राहावे, लक्षणे आढळल्यास त्वरीत आपल्या जवळील शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.
जिल्ह्यात विविध ठिकाणी क्षयरुग्णांना पोषण आहार किट (फूड बास्केट) देखील वितरित करण्यात आले. या प्रसंगी मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते क्षयरोग निर्मूलनासाठी योगदान देणाऱ्या ‘निक्षय मित्र’ यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे अलिबाग तालुक्यातील सहाण, पेढांबे, चिंचोटी व बेलोशी या ग्रामपंयातींना क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत म्हणून सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com