

घाटकोपरमध्ये टँकरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
घाटकोपर, ता. २८ (बातमीदार) : घाटकोपर पूर्व येथील सिंधूवाडी जंक्शन परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यामिनी सुवारे (२८, रा. पंतनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिग्नलवर टँकर उभा असताना यामिनी सुवारे रस्ता ओलांडत होती. या वेळी रस्ता पूर्णपणे पार करण्याआधीच भरधाव टँकरचालकाने अचानक टँकर पुढे नेला. त्यामुळे ती टँकरच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टँकरचालकाला ताब्यात घेऊन अटक केली. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून, या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.