मुंबई- गोवा महामार्गावर हिंदी भाषेच्या फलकांविरोधात मनसे आक्रमक

मुंबई- गोवा महामार्गावर हिंदी भाषेच्या फलकांविरोधात मनसे आक्रमक
Published on

मुंबई–गोवा महामार्गावर हिंदी फलकांवरून मनसेचा इशारा
पेण, ता. २६ (वार्ताहर) : मुंबई–गोवा महामार्गावरील रस्ता सुरक्षेसाठी लावण्यात येणाऱ्या हिंदी फलकांविरोधात मनसे आक्रमक झाली असून ४८ तासांत मराठी फलक न लावल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी उपप्रादेशिक कार्यालय पेण यांना निवेदनाद्वारे दिला आहे. पनवेल ते पेण दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बसविण्यात येणाऱ्या फलकांवर हिंदीचा वापर होत असल्याने मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरही स्थानिक भाषेला दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तरणखोप, बोरी फाटा, डोलवी आदी ठिकाणी फलक उभारण्याचे काम सुरू असून ते तातडीने मराठीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रांताधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निवेदन दिले आहे. मागणी मान्य न झाल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com