दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचवणारे ५४ देवदूत

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचवणारे ५४ देवदूत
Published on

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचवणारे ५४ देवदूत
दहावी, बारावीसाठी ठाणे वाहतुक शाखेने राबवला यशस्वी उपक्रम
ठाणे शहर, ता. २६ (बातमीदार) ः वाहतूक कोंडीत अडकलेल्या ४६ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान वाचवण्याचे कौतुकास्पद काम ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेच्या काळात वाहतुकीचे योग्य नियोजन करून परीक्षार्थिंना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहचता यावे याची काळजी घेतली आहे. या काळात वाहतूक विभागाने ५४ रायडर्स तैनात ठेवले होते. त्यांनी काही ठिकाणी ग्रीन कॉरिडॉर्स सदृश्य निर्णय घेत विद्यार्थ्यांना सायरणाचा आवाज करत परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहचवले आहे. वाहतूक पोलिसांच्या या उपक्रमाचे पालक वर्गाकडूनही कौतुक झाले आहे.
शहरातील रस्त्यांवर सुरु असलेली कामे, होणाऱ्या वाहतूक कोंडीने यंदा पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले होते. पाल्य वेळेत परीक्षा केंद्रावर पोहचणार की नाही याची चिंता होती. मात्र, ठाणे शहर वाहतूक पोलिसांच्या रायडर्स उपक्रमामुळे त्यांची ही चिंता मिटण्यास मदत झाली आहे. वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या कल्पकतेतून निर्माण झालेल्या ५४ रायडर्सने चांगली कामगिरी करत दहावी-बारावीच्या परीक्षेच्या काळात ४६ विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहचवून त्यांचे शैक्षणिक वर्ष वाचवले आहे. १० फेब्रुवारी ते १८ मार्चच्या कालावधीत रायडर्सने ४६ परीक्षार्थिंना वेळेत परिक्षा केंद्रावर पोहचवण्यात मोलाची कामगिरी बजावली. ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सह पोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम ठाणे पोलिस आयुक्तालयात राबवण्यात आला.

अडचणींवर मात
वाहतूक कोंडी, वाहन बिघाड, लोकल उशीर अशा अडचणींमुळे उशीर होणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली. या काळात विभागातील १८ उपविभागांनी चोख भूमिका बजावली आहे. वाहतूक विभागाच्या रायडर्सनेच नव्हे, संपूर्ण वाहतूक विभागाने ही काळजी घेतली आहे.

आलेले कॉल आणि केलेली मदत :
१० फेब्रुवारी - २५
१७ फेब्रुवारी - १
१८ फेब्रुवारी ते १८ मार्च - २१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com