

ढोकाळी परिसरात सोनसाखळी लंपास
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : ढोकाळी परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटना घडली असून दुचाकीवरून धूम स्टाईलने आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी एका व्यक्तीच्या गळ्यातील एक लाख १० हजारांची सोनसाखळी हिसकावून पळ काढल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोलशेत रोड येथे राहणारे तक्रारदार अभिषेक खंडेलवाल (वय ३३) हे २२ मार्च रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास हायलँड परिसरातून घरी जात होते. यावेळी ढोकाळी येथील शरदचंद्र पवार स्टेडियमसमोर त्यांनी आपली चारचाकी गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून ते जवळच्या दुकानात गेले. दुकानातून परत येऊन गाडीत बसत असतानाच ढोकाळी नाक्याकडून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी अचानक त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून घेतली. चोरीस गेलेल्या सुमारे ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या चेनची किंमत अंदाजे एक लाख १० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.