

एकदरा येथे रामभक्तांची मांदियाळी
ग्रामस्थांनी घडविले ऐक्याचे दर्शन
मुरुड, ता. २६ (बातमीदार) ः कोकणासह देशभरात रामनवमी उत्सव अत्यंत भक्तीभावाने साजरा करण्यात येतो. मुरुड नजिकच्या एकदरा कोळी बांधवांतर्फे श्रीरामोत्सव हा अनोख्या पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. सांस्कृतिक वैविध्य आणि मिरवणूकीतून रामायणकालीन जिवंत देखाव्यांनी सजलेल्या या सोहळ्याने अवघ्या मुरुड पंचक्रोशीचे लक्ष वेधून घेतले.
श्रीराम मंदिराच्या प्रांगणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत हभप परशुराम उपाध्ये यांनी आपल्या सुश्राव्य कीर्तनातून रामकथा सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली. यंदाच्या पूजेचा युवा कार्यकर्ते चिंतामणी गणेश लोदी व दिनेश पाटील यांना मान मिळाला. दुपारी रामलल्लाचा जन्मकाळ सोहळा पार पडल्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी पाळण्यातील रामलल्लाच्या दर्शनासाठी महिला व पुरुषांनी मोठी गर्दी केली होती.
एकदरा गावापासून श्रीरामाची पालखी मिरवणूक काढली. फुलांनी सजवलेल्या रथातून रामायणकालीन पौराणिक देखावे साकारत खालुबाजे, बेंजो, डीजेच्या तालावर पारंपारिक वेशभूषेने नटलेल्या महिला-पुरुषांच्या नृत्याविष्काराने सर्वांचेच लक्ष वेधन घेतले. या मिरवणुकीत अबाल वृध्दानी सहभाग घेतला होता.
मिरवणुकीत पौराणिक देखावे
यंदा चित्ररथावर प्रभुराम आणि सीतामाई आणि राम व परशुराम युद्ध तसेच प्रभू रामचंद्र आणि दशमुखी रावण युद्ध हा देखावा साकारला असल्याचे मुख्य पुजारी धर्मा पाटील आणि गणेश लोदी यांनी सांगितले. सीताहरण केलेले अशोकवनाचे दृश्य तसेच वानरसेनेला घावलेला लंकामार्ग हुबेहुब साकारण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.