''हिट अँड रन'' प्रकरणी अल्पवयीन मुलासह आईवर गुन्हा दाखल

''हिट अँड रन'' प्रकरणी अल्पवयीन मुलासह आईवर गुन्हा दाखल
Published on

अल्पवयीन मुलासह आईवर गुन्हा दाखल
''हिट अँड रन'' प्रकरणी पोलिसांची कारवाई
कल्याण, ता.२६ (बातमीदार) : गांधारी रिंग रोडवर सायकलस्वाराचा बळी घेणाऱ्या ''हिट अँड रन'' प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी कारवाई केली आहे. या भीषण अपघातात १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अल्पवयीन मुलाच्या हातात कार सोपवल्याबद्दल त्याच्या आईवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी ( ता. २४) सायंकाळी श्रीनिवास तांदळे हे रिंग रोडवर सायकलवरून जात असताना एका १६ वर्षे ८ महिने वयाच्या मुलाने आपल्या ताब्यातील कार अत्यंत भरधाव वेगाने चालवून त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, तांदळे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर खडकपाडा पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून संबंधित मुलाला ताब्यात घेतले आणि बाल न्यायालयात हजर केले.

अपघातातील कार जप्त करण्यात आली असून, ती मुलाच्या आईच्या नावावर असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अल्पवयीन मुलाला वाहन चालवण्यास देऊन निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल पोलिसांनी आईलाही या गुन्ह्यात सहआरोपी केले आहे. आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास देऊ नका. अशा प्रकरणांत मुलांसोबतच वाहन मालकावरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा खडकपाडा पोलिसांनी पालकांना दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com