बेलापूर स्थानक परिसरातील रस्त्यांची दुरवस्था

बेलापूर स्थानक परिसरातील रस्त्यांची दुरवस्था
Published on

बेलापूर स्थानक परिसरातील रस्त्यांची दुरवस्था
तात्पुरत्या मलमपट्टीवर नागरिकांचा संताप
नेरूळ, ता. २६ (बातमीदार)ः शहराच्या दळणवळणासाठी आणि शासकीय कामांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानला जाणारा बेलापूर रेल्वे स्थानक परिसर आज गंभीर दुर्लक्षाचे उदाहरण ठरत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून येथील रस्त्यांमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेकदा तक्रारी करूनही दुर्लक्ष करण्यात येत होते.
अखेर डांबरीकरणाला सुरुवात झाली असली तरी सध्या केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. या परिसरातून दररोज हजारो प्रवासी ये-जा करीत असून, रिक्षाचालक व वाहनचालकांना खड्ड्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक महिन्यांपासून स्थानिक रिक्षाचालक संघटनेने सिडको प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून येथील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे होत असलेला त्रास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. या तक्रारीनंतर कामाला सुरुवात करण्यात आली, मात्र हे कामही निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
स्थानक परिसरात डांबरीकरण करण्याऐवजी पेव्हर ब्लॉक बसवून अर्धवट आणि हलगर्जीने काम करण्यात आले आहे. परिणामी रस्ते उखडलेले, असमतोल आणि अधिक धोकादायक बनले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका लक्षणीयरीत्या वाढला असून, दररोज हजारो प्रवासी आणि वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
पावसाळ्यात ब्लॉकखाली पाणी साचून अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एकवीरा रिक्षाचालक-मालक संघटनेने तत्काळ लक्ष देऊन प्रशासनाने दर्जेदार व कायमस्वरूपी डांबरीकरण करावे, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com