

युरियाचा टेम्पो पोलिसांच्या ताब्यात
बोईसर, ता. २६ (वार्ताहर) ः तारापूर औद्योगिक क्षेत्रात युरिया खताने भरलेला टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणात कृषी विभागाने युरियाचे नमुने ताब्यात घेतले असून अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका रासायनिक कंपनीजवळ युरियाच्या गोण्या भरलेला टेम्पो संशयावरून पोलिसांनी अडवला होता. हा टेम्पो नाशिक येथून निघाल्याची माहिती समोर आली आहे. टेम्पोमधील गोण्यांवर ‘औद्योगिक वापरासाठीचा युरिया’ असा उल्लेख असल्याने काळाबाजार करून औद्योगिक वापरासाठी आणल्याचा संशय आहे. याशिवाय चालकाकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेतला आहे.
----------------------------
अहवालाची प्रतीक्षा
बोईसर पोलिस, पंचांच्या उपस्थितीत पालघर कृषी विभागाच्या निरीक्षकांनी दोन गोण्यांमधील युरियाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर याप्रकरणी पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.