

पगार थकल्याने डम्परचालक आक्रमक
मालकाची कार १५ फूट फरपटत नेली
डोंबिवली, ता. २६ : वेतन थकल्याच्या रागातून एका डम्परचालकाने आपल्याच मालकाची कार डम्परने तब्बल १० ते १५ फूट फरपटत नेल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर परिसरात घडली आहे. या थरारक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, विष्णूनगर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएमआरडीएच्या टिटवाळा ते माणकोली मोठागाव बाह्यवळण रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पावर अनेक ठेकेदार आणि शेकडो कामगार कार्यरत आहेत; मात्र गेल्या महिनाभरापासून काही कामगारांचे वेतन थकल्याने त्यांच्यात संतापाचे वातावरण होते. वारंवार मागणी करूनही पैसे न मिळाल्याने एका चालकाने थेट मालकाच्या गाडीवरच राग काढला.
कारचे मोठे नुकसान
संबंधित ठेकेदार मंगळवारी (ता. २४) कामाची पाहणी करण्यासाठी आपली कार रस्त्याच्या कडेला उभी करून बाजूला गेले होते. त्याच वेळी संतापलेल्या डम्परचालकाने आपल्या अवजड वाहनाने कारला समोरून धडक दिली आणि तिला फरपटत नेले. ही कार दुसऱ्या एका डम्परला जाऊन धडकली, ज्यामध्ये गाडीचा चक्काचूर झाला आहे. सुदैवाने कारमध्ये कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर चालक फरार झाला असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.