

नवी मुंबई, ता. २६ (वार्ताहर) : नेरूळ पोलिसांनी सेक्टर १९ येथील श्री स्वामी समर्थ मठात झालेल्या चोरीचा छडा अवघ्या चार तासांत लावला आहे. तसेच मठातील ५३० ग्रॅमचे पादुकांच्या चांदीचे वेष्ठन चोरणाऱ्या संशयिताला अटक केली आहे. पंकज रामलोचन विश्वकर्मा (वय २३) याच्याकडून एक लाख १६ हजार किमतीच्या पादुकांच्या चांदीचे वेष्ठन हस्तगत केले आहे.
नेरूळमधील स्वामी समर्थ मठातून रविवारी (ता. २२) मध्यरात्री स्वामींच्या पादुकांवरील चांदीचे वेष्ठन चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. देवस्थानातील चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली होती. त्यामुळे पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील दोन पथक तयार करण्यात आले. या पथकाने घटनास्थळावरील तसेच शहरातील कमांड कंट्रोल रूमचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा पाठलाग केला. त्यानंतर पोलिसांनी नेरूळमधून पंकज रामलोचन विश्वकर्मा याला अवघ्या चार तासांत ताब्यात घेतले. या प्रकरणात अटक करण्यात आलेला संशयित व्यवसायाने वॉचमन असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील प्रयागराज (बडोखर) येथील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वीच तो नवी मुंबईत आला असून त्याला कामधंदा नसल्याने तो सध्या फिरस्ता म्हणून वावरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.