

मुलुंडमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुलुंड, ता. २६ (बातमीदार) : मुलुंड येथील ‘सुमती’ या सेवाभावी संस्थेतर्फे रविवारी (ता. २२) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुलुंड पूर्वेतील मराठा मंडळ सभागृहात आयोजित या शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तब्बल १५३ नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजकार्याला हातभार लावला. वाढत्या उष्णतेमुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर आयोजित करण्यात आले होते, अशी माहिती ‘सुमती’ संस्थेचे समन्वयक विनोद हरिया यांनी दिली. या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आणि रक्तदान करून सहकार्य केल्याबद्दल त्यांनी सर्व नागरिकांचे आभार मानले.