

जुईनगर, ता. २६ (बातमीदार) : नेरूळ गावात श्रीराम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या त्रिदिनीय ‘श्रीराम चरित्र चिंतन’ सोहळ्याला ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण गाव भक्तिरसात रंगून गेले होते. या सोहळ्यात आळंदी येथील महंत ज्ञानेश्वर महाराज यांनी श्रीराम कथामृताचा भावपूर्ण व प्रभावी निरूपण करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तीन दिवस चाललेल्या या रामकथेत भगवान श्रीरामांच्या जीवनचरित्रातील विविध प्रसंगांचे सखोल विवेचन करण्यात आले. शेवटच्या दिवशी राम जन्म सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. जयघोष, भजन-कीर्तन आणि धार्मिक विधींनी वातावरण भारावून गेले होते. या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते अक्षय पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. नेरूळ ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रामकथेचा आनंद घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.