

बोईसरमध्ये शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांसाठी परवानगीची मागणी
तारापूर, ता. २६ (बातमीदार)ः बोईसर शहरात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांच्या अनावरणासाठी परवानगी देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. याबाबत शिवशंभु प्रतिष्ठान, बोईसर यांच्यावतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे.
बोईसर शहरात अद्याप छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकही पूर्णाकृती पुतळे नसल्याची खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. निवेदनात बोईसरच्या प्रवेशद्वाराजवळ मुकुट कंपनी परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, तसेच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मधुर हॉटेलजवळील आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी पालघर जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना व आदेश देण्याची विनंती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.