डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त महापालिकेची नियोजन बैठक

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त महापालिकेची नियोजन बैठक
Published on

पनवेल, ता. २५ (बातमीदार) : लोकसहभागातून महापालिकेतर्फे १४ एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पनवेल शहरामध्ये मिरवणूक काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित नियोजन बैठकीत उत्सवाच्या सर्व तयारीची रूपरेषा निश्चित करण्यात आली.

मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, सुरक्षाव्यवस्था, स्वच्छता व विविध सुविधा याबाबत नियोजनविषयक चर्चा करण्यात आली. मिरवणुकीसाठी रुग्णवाहिका, थंड पाणी, अल्पोपहार, एनर्जी ड्रिंक, सुरक्षा रक्षक, प्रकाशव्यवस्था आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाणार असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक गावडे यांनी दिली. या वेळी उपस्थित नागरिकांच्या सूचना घेऊन त्याविषयी चर्चा झाली. या बैठकीला आयुक्त मंगेश चितळे, उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, महापालिका सदस्य हरीश केणी, तुषार पाटील, अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मिरवणूक नियोजन
जयंतीच्या दिवशी सकाळी ७ वाजता नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ एकत्र जमून पुष्पहार अर्पण केला जाईल. सकाळी ७.२० वाजता पुतळ्याजवळून मिरवणुकीला प्रारंभ होईल. मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक, एमटीएनएल रोड, संत जगनाडे महाराज चौक, रोहिदास वाडा, टपाल नाका, कर्नाळा सर्कल, भाजी मार्केट, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, विरुपाक्ष मंदिर, नील सॉलिटीयर इमारत, शिवाजी चौक यामार्गे नाट्यगृह येथे पोहोचून समाप्त होईल. त्यानंतर नाट्यगृह येथे पुढील कार्यक्रम होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com