

‘सहयोग’च्या दहाव्या वर्षात कला, सेवा आणि मानवी मूल्यांचा संगम
पोलीस दलाच्या कल्याणासाठी उपक्रम; विविध क्षेत्रांतील कलाकारांचा सहभाग
मुंबई, ता. २६ : कला ही केवळ व्यावसायिक चौकटीत मर्यादित न राहता समाजातील विविध स्तरांना जोडणारे एक प्रभावी माध्यम ठरते. याच संकल्पनेला अधोरेखित करत ‘सहयोग कंटेम्पररी आर्ट एक्सहिबिशन’ यंदा आपल्या १०व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने कला, सेवा आणि मानवी मूल्यांचा संगम अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. प्रभादेवी येथील कला दालनात २७ मार्च ते २ एप्रिल दरम्यान हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात विविध क्षेत्रांतील कलाकार सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे, प्रस्थापित कलाकारांसह महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, विधी क्षेत्र आणि नागरी सेवांमधील सदस्य सहभागी होत असून, विविध कलाशैलींचा संगम पाहायला मिळणार आहे. कलाकार सत्येंद्र राणे यांच्या क्युरेशनखाली हा उपक्रम साकारत आहे.
या प्रदर्शनात मुंबई पोलीस वेल्फेअर असोसिएशनसोबतची भागीदारी असून प्रदर्शनातील कलाकृतींच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग पोलीस कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी देण्यात येणार आहे.
प्रदर्शनात अमूर्त, समकालीन, निसर्गचित्रे, पोर्ट्रेट्स, मिश्र माध्यम आणि शिल्पकला अशा विविध प्रकारच्या कलाकृतींचा समावेश असून, शिस्त आणि कल्पकतेचा संगम प्रत्येक कलाकृतीतून दिसून येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.