

नवी मुंबई, ता. २६ (वार्ताहर) : आखाती देशांतील वाढत्या संघर्षाचे पडसाद आता थेट नवी मुंबईतील खारघरमध्ये उमटू लागले आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे आगामी काळात पेट्रोलचा पुरवठा खंडित होईल, अशा अफवा समाजमाध्यमांवर वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. परिणामी गुरुवारी (ता. २६) सकाळपासूनच खारघरमधील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी आपल्या दुचाकी आणि चारचाकीच्या टाक्या भरण्यासाठी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे अनेक ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाहनामध्ये इंधन भरण्यासाठी नागरिकांनी बुधवारी (ता. २६) रात्रीपासूनच पेट्रोल पंपावर धाव घेतल्याने अनेक ठिकाणी साठा रात्रीच संपुष्टात आला होता. गुरुवारी सकाळपर्यंत खारघरमधील काही पंप ‘ड्राय’ झाले असून, तिथे ‘नो स्टॉक’चे फलक पाहायला मिळत आहेत. ज्या पंपांवर सध्या पेट्रोल सुरू आहे तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या रांगेत शेकडो वाहने उभी असल्याचे चित्र दुपारी पाहायला मिळाले. या रांगा मुख्य रस्त्यांपर्यंत आल्याने खारघरमधील काही ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होत आहे. इंधन मिळेल की नाही, या शंकेने सर्वजण टाकी फुल करून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मला स्वतःला पेट्रोल भरण्यासाठी सुमारे पाऊण तास रांगेत उभे राहावे लागले, असे खारघरमधील रहिवासी जितेंद्र गोतसुर्वे यांनी सांगितले.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता असली, तरी सध्या इंधन पुरवठा बंद होणार असल्याची कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनाने दिलेली नाही. नागरिकांनी घाबरून न जाता केवळ अफवांच्या जोरावर गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र अचानक पेट्रोल संपले तर काय, या भीतीपोटी नागरिक सध्या पंपांवर दीर्घकाळ थांबून इंधन भरण्याला प्राधान्य देत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.