खारघरमधील सेंट्रल पार्कमध्ये पाण्याची नासाडी

खारघरमधील सेंट्रल पार्कमध्ये पाण्याची नासाडी
Published on

खारघरमधील सेंट्रल पार्कमध्ये पाण्याची नासाडी
गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया; नागरिकांचा संताप, दुरुस्तीची मागणी
खारघर, ता. २६ (बातमीदार) : खारघरमधील सेंट्रल पार्क परिसरात पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. उद्यानातील पाणपोईच्या जलवाहिनीला गळती लागल्यामुळे रस्त्यावर पाणी वाहत असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खारघरमधील अनेक भागांत अजूनही पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवाशांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत सिडकोच्या उद्यानातून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकाराचे व्हिडिओ व छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष समोर आले आहे.
उद्यानात सुमारे २० सुरक्षा रक्षक कार्यरत असूनही गळतीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही समस्या वारंवार होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर ही नासाडी तात्काळ थांबवून जलवाहिनीची दुरुस्ती करावी व जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com