पनवेल महापालिकेत दिव्यांग सुविधांचा आढावा

पनवेल महापालिकेत दिव्यांग सुविधांचा आढावा
Published on

पनवेल महापालिकेत दिव्यांग सुविधांचा आढावा
सुगम्य सुविधा व तांत्रिक सुधारांवर भर
पनवेल, ता. २५ (बातमीदार) : पनवेल महानगरपालिकेत दिव्यांग बांधवांसाठी उपलब्ध सुविधांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी विविध विभागांच्या कामकाजाची सद्यस्थिती तपासून आवश्यक सूचना देण्यात आल्या.
बैठकीत सार्वजनिक ठिकाणे अधिक सुगम्य करण्यासाठी आवश्यक सुविधा, वाहतूक व्यवस्था तसेच महापालिकेची वेबसाईट दिव्यांगांसाठी सुलभ करण्याबाबत चर्चा झाली. माहिती व तंत्रज्ञानाशी संबंधित सुधारणा करण्यावरही भर देण्यात आला. अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
दिव्यांग विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेऊन दिव्यांगांच्या समस्या व मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी उपायुक्त रवीकिरण घोडके, प्रसेनजित कार्लेकर, सुबोध ठाणेकर, डॉ. रुपाली माने, आनंद गोसावी, हरेश जाधव यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com