

अवतारी पुरुष असल्याचे
सांगून महिलेवर बलात्कार
वसईतील स्वयंघाेषित धर्मगुरूविरुद्ध गुन्हा
विरार, ता. २६ (बातमीदार) : राज्यात भाेंदूबाबा अशाेक खरात प्रकरण ताजे असतानाच वसईतही एक प्रकरण उघडकीस आले आहे. अवतारी पुरुष असल्याचे सांगून एका धर्मगुरूने बलात्कार केल्याची तक्रार पीडित महिलेने माणिकपूर पाेलिस ठाण्यात दाखल केली आहे. याप्रकरणी ऋषिकेष वैद्य (४०) या स्वयंघाेषित धर्मगुरूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी हे प्रकरण पुण्यातील हडपसर पाेलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.
पीडित महिला ३५ वर्षांची असून ती पुण्यात राहते. २०२३मध्ये तिची ऋषिकेश वैद्य याच्याशी फेसबुकवर ओळख झाली. त्याने आध्यात्मिक शिक्षणाच्या नावाखाली तिच्याशी जवळीक साधली. डिसेंबर २०२३मध्ये तो तिला भेटायला पुण्यात गेला. तेथे अवतारी पुरुष असल्याच्या भूलथापा देऊन तिला पुण्यातील मांजरी येथील एका लॉजमध्ये नेले. तेथे गुंगीचे द्रव्य असलेले पदार्थ देऊन अत्याचार केल्याचे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या वेळी अश्लील छायाचित्रे काढून त्याद्वारे त्याने तिला बदनामी करण्याची धमकी देऊन पुन्हा भेटायला बोलावले. मे २०२५मध्ये वसईतील एका हाॅटेलमध्ये तिच्यावर पुन्हा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. नाशिकमधील अशाेक खरात प्रकरण उघड झाल्यानंतर पीडितेने हिंमत दाखवून आपल्या पतीला हा प्रकार सांगितला. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी वसईच्या माणिकपूर पोलिस ठाण्यात वैद्य याच्याविरोधात तक्रार दाखल केली. बलात्काराची पहिली घटना पुण्यात घडल्याने हे प्रकरण हडपसर पोलिस ठाण्यात वर्ग केल्याची माहिती माणिकपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हिरालाल जाधव यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.