

ट्रेलरच्या धडकेत
रिक्षाचालक ठार
नवी मुंबई, ता. २७ (वार्ताहर) : भरधाव ट्रेलरने सिग्नलवर थांबलेल्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना गुरुवारी (ता. २६) घडली. बी.एम.सी.टी. पोर्ट ते प्री-गेटदरम्यान असलेल्या उड्डाणपुलाजवळ ट्रेलरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रेलरचालक फरार असून न्हावा शेवा पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या अपघातातील मृत रिक्षाचालकाचे नाव किसन ठाकूर (५६) असे असून ते उरणमधील जसखार येथे कुटुंबासह राहत होते. किसन ठाकूर आपल्या ताब्यातील रिक्षा चालवत असताना उड्डाणपुलाखालील प्री-गेट सिग्नलजवळ थांबले होते. याच वेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरचालकाने बेदरकारपणे वाहन चालवून ठाकूर यांच्या रिक्षाला पाठीमागून जोरात धडक दिली. ठाकूर यांची रिक्षा पुढे असलेल्या दुसऱ्या एका वाहनावर जाऊन आदळली. या दोन मोठ्या वाहनांच्या मध्ये रिक्षा अडकल्याने किसन ठाकूर हे गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. न्हावा शेवा पोलिसांनी याप्रकरणी ट्रेलरचालकाविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर ट्रेलरचालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.