3 चिमुकल्यांसोबत अश्लील व लैंगिक चाळे करणाऱया 70 वर्षीय नराधमाला बेडया;

3 चिमुकल्यांसोबत अश्लील व लैंगिक चाळे करणाऱया 70 वर्षीय नराधमाला बेडया;
Published on

अल्पवयीन मुलींचा विनयभंग
करणारा वृद्ध अटकेत

नवी मुंबई, ता. २७ (वार्ताहर) : बेलापूर येथील शहाबाज गावात राहणाऱ्या एका ७० वर्षीय वृद्धाने तीन अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करून त्यांचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोहम्मद अख्तर अब्दुल रहीम झापडेकर (७०) असे या वृद्धाचे नाव असून एनआरआय सागरी पोलिसांनी त्याच्याविरोधात विनयभंगासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून गुरुवारी (ता. २६) रात्री त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेतील सात, नऊ आणि दहा वर्षांच्या तीन अल्पवयीन मुली गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शहाबाज गावातील आपल्या इमारतीजवळ खेळत होत्या. या वेळी त्या भागातून जाणाऱ्या आरोपीने या मुलींना गाठले. त्यानंतर त्याने या चिमुकल्यांशी अश्लील व लैंगिक वर्तन करून त्यांचा विनयभंग केला. पीडित मुलींनी घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर हे संतापजनक कृत्य उघडकीस आले. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने तातडीने एनआरआय सागरी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com