मिरा भाईंदर महापालिकेच्या अर्थसंकल्पावर महासभेची मोहोर

मिरा भाईंदर महापालिकेच्या अर्थसंकल्पावर महासभेची मोहोर
Published on

मिरा भाईंदर महापालिकेच्या अर्थसंकल्पावर महासभेची मोहर

भाईंदर, ता. २७ (बातमीदार) : मिरा भाईंदर महापालिकेच्या अर्थसंकल्पाला महासभेत शुक्रवारी (ता. २७) अंतिम मान्यता देण्यात आली. चार हजार ५८५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला महासभेने मान्यता दिली. अर्थसंकल्पाला मान्यता देताना सत्ताधारी भाजपने कोट्यवधी रुपयांची मंजूर करून घेतलेली विकासकामे महासभेत चर्चेचा विषय ठरली.
१० मार्चला आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी सुमारे चार हजार ४६१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर केला होता. त्यात स्थायीने सुमारे १०० कोटी रुपयांची वाढ करून तार हजार ५८५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महासभेपुढे शिफारस केला होता. शुक्रवारी (ता. २७) स्थायी समिती सभापती हसमुख गेहलोत यांनी अर्थसंकल्प सभागृहात महापौर डिंपल मेहता यांना सादर केला. त्यानंतर महासभेने त्याला मान्यता दिली. मात्र अर्थसंकल्पाला मान्यता देण्याचा विषय सभागृहासमोर असताना सत्ताधारी भाजपने कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या यादीलाही मान्यता दिली. यावर विरोधी पक्षातील काँग्रेसने आक्षेप घेतला. विकासकामांना मान्यतेचा विषय विषयपत्रिकेत नसताना त्याला मान्यता कशी दिली, असा प्रश्न काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत यांनी उपस्थित केला.
मात्र मान्यता दिलेल्या विकासकामांचा अर्थसंकल्पात समावेश असून, त्यातील काही कामांची मुदत संपुष्टात आली असल्याने त्याला दोन महिन्यांची मुदतवाढ देऊन निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी आर्थिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, असा खुलासा उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी केला. त्यानंतर अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात येत असल्याचे महापौरांनी घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com