

प्रदूषणाविरोधात श्रमजीवी आक्रमक
वाडा औद्योगिक वसाहतीत ठिय्या आंदोलन
वाडा, ता. २८ (बातमीदार) ः वाडा तालुक्यातील अबिटघर येथील सनशाईन पॅपटेक प्रा. लि. कंपनीविरोधात श्रमजीवी संघटना आक्रमक झाली आहे. याच अनुषंगाने शुक्रवारी कंपनीच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन करत प्रदूषणाविरोधात रोष व्यक्त केला.
कंपनीकडून प्लॅस्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात जाळला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या प्रदूषणामुळे परिसरात धूर, दुर्गंधी, विषारी वायू पसरत असून नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे. लहान मुले, महिला, वृद्ध नागरिक विशेषतः त्रस्त आहेत. याबाबतची तक्रार आबिटघर ग्रामपंचायतीकडे करण्यात आली आहे; पण कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने अखेर श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलकांनी कंपनी बंद करा, आमच्या जीवाशी खेळू नका, अशा घोषणांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
-----------------------------------
तणावाचे वातावरण
कंपनीकडून होणारे प्रदूषण पूर्णपणे थांबवून कंपनीवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याची भूमिका श्रमजीवीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. तसेच आंदोलनानंतरही शासनाच्या वतीने एकही अधिकारी घटनास्थळी नसल्याने आंदोलक आक्रमक झाले होते. त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण झाल्याने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.